Saturday, 7 December 2019

बलात्कार


  तुम्ही जीवनात कधी बलात्कर केलाय का हो ? आहो, तुमच्या जिभेला काही हाड! हा काय प्रश्न आहे! बला त्कर नि आम्ही. कधी च नाही. आणि असा विचित्र नि  उर्मठ प्रश्न विचारु च कस शकता तुम्ही आम्हाला.
असे काही भाव आले असतील हा प्रश्न बघुन तुम्हच्या  मनामध्ये.

  तुम्हला कदाचित्  माहिती असेल नसेल पण जवळपास 90% हुन अधिक लोकांनी केलाय नि करताय बलात्कर रोज. आणि अंधरात लपुन छ्पुन नाही उघड उघड सर्वा समोर एका स्री ची अब्रु लुटली जातेय सर्वासमोर. आणि  कोणी काही च बोलत नाही. जो तो आपल्या कामाशी काम ठेवतोय बस..

  हे येवढ सगळ होतय नि कोणी काहीच बोलत नाही, कसं काय शक्य आहे? हा प्रश्न पडला असेल तुम्हला  नाही का. बलात्कर म्हणजे नमके काय हो, एका देहाची निर्दयी पद्धतिने अलोचना करणे, त्या देहाच्या प्रताड्ना करणे.  प्रत्यक्ष झाल्यस आपन त्याला बलात्कार म्हणतो. नि जर समजा हे सर्व शब्दाच्या स्वरुपात होत असेल तर त्याला शाब्दिक बलात्कार नाही म्हणता येनार !!

  हो, मी बात करतोय शिव्या बद्दल च. शिव्या ह्या शिव्या नसून तो एक प्रकारचा बलात्कार च असतो, "शाब्दिक बलात्कार." कधी कोणी नीट विचार केलाय का याचा, शिव्यात वापरले जानार्या शब्दान चा, वाक्यांचा. आठवून बघा आता लगेच दिलेल्या एखाद्या शिवी बद्दल, काय शब्द होते त्यात? किती सहज देवून जातो ना शिवी एखाद्या ला आपण. एखादा बलात्कारी जे प्रत्यक्ष करतो, तेच तर होत येते  फक्त शब्दान स्वरुपात. असे असंख्य शब्दिक बलात्करी बघायला मिळतात समाजात रोज. कित्येकाचे एक  वाक्य पुर्ण होत नाही या शिवाय.

  शेवटी एक गोष्ट तुम्हाला च विचार करण्यासाठी सोडतो, ती अशी की कधी या गोष्टीचा पण विचार करा की हा बलात्कार कोणा वर होतोय, कोणी आपल खुप जवळच, रक्ताच तर याच शिकार होत नाहीये ना. शेवटी तुम्ही च विचार करा, आयुष्य तुम्हचय नि शब्द ही..

Tuesday, 1 October 2019

सबका बाप होता हैं ।

जीवनात एक गोष्ट आपण नेहमी अनुभवलेली असते ती म्हणजे ती म्हणजे स्पर्धा. स्पर्धा ही फक्त कुठल्या खेळाच नसून  ती अभ्यासात प्रथम क्रमांक मिळवून इतरांनापेक्षा हुशार सिद्ध करण्या ची असू शकते.  व्यवसायामध्ये आपल्या प्रतिस्पर्धी पेक्षा अधिक नफा, यश मिळवण्याची असू शकते. तसेच समाजात एक उच्च, आदरयुक्त स्थान मिळवण्याची असू शकते.

म्हणजे तुम्ही कोणी असाल, नि काही ही करत असाल पण तेच काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती पेक्षा कशा प्रकारे मी ते अधिक चांगल्या प्रकारे ते करू शकेल हा विचार प्रत्यक्ष , अप्रत्यक्षपणे करतच असता.  बहुतांश लोक त्यांच्या सतात्याच्या नि परिश्रमच्या जोरावर एक दिवस ते साध्य ही करतात. त्या वेळेस त्याच्या क्षेत्रातील बाप झालेले असतात. आणि ते त्याच्या आयुष्यातील ते सुंदर आनंददायी दिवस जगात असता.

पण अचानक काही दिवसाने एक असा व्यक्ती त्यांना भेटतो जो की त्याच्याही पेक्षा त्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून बसलेला असतो. आणि ह्या क्षेत्रातील जुन्या बापाचा पण तो बाप असतो.
त्यामुळे एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवणे गरजेचे असते की जीवनात माणसाला कुठल्याही गोष्टी चा न्यूनगंड/  superiority complex नसावा.  अर्थ असाही नाही की  confort zone नसावा. जीवनात प्रत्येक  माणसाच्या नि वस्तू च्या life चे 4 phases असता
Introduction
Growth
Maturity आणि
Decline
या नुसार प्रत्येक जण कधी तरी बाप झालेला असतो नि कालांतराने पुन्हा त्याचा ही कोणीतरी दुसरा बाप हा जन्माला येतोच. त्यामुळे कधी तुमच्या हातून जर कुठल्या गोष्टी ची  सत्ता, अधिकार निघून जात असतील तर निराश होऊ नका. हा तर निसर्गाचा नियम च आहे की "सबका बाप होता है।"

Saturday, 28 September 2019

संधी च सोन / Golden Opportunity

 

जीवनात एक गोष्ट आपण सर्वांनी नेहमी ऐकली असेल ती म्हणजे की  "मिळालेल्या संधी च सोन करायला हवंय." पण आजच्या जगामध्ये ही बाब कितपत खरी ठरते, हे मोठ प्रश्न चिन्ह च आहे.  कारण आज च जग हे स्पर्धेच जग आहे.  आज संधी ही तुमच्याकडे चालून येत नाही तर  तुम्हालाच ती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल .  संधी येऊन तुमचं दारं ठोठावेल , असा जो पर्यंत तुम्ही विचारच करत असाल, तो पर्यंत दुसरा येऊन ती तुमच्या हातून ती हिसकावून घेऊन गेलेला असेल.  त्यामुळे स्वतः मधील आत्मविश्वास वाढवून धीट व्हायला हवाय. परिणामाचा खूप विचार न करता लगेचच संधी ला स्वतःकडे ओढून घ्या. कदाचित पहिल्या डावात तुम्ही विशेष करू नाही शकणार पण ती गोष्ट तुम्हाला एक अनुभव देऊन जाईल. पुन्हा त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी एक आत्मविश्वास देऊन जाईल. स्वतःला जितकी कठोर आव्हानं  तुम्ही  द्याल. तितकेच अधिक तुम्ही विकसित मौल्यवान होत जाल. ज्या प्रमाणे एक हिरा 1000 टाचाचे घाव सहन करून मौल्यवान होतो  अगदी त्याच प्रमाणे.  त्यामूळे स्वतःला विकसित करण्याचा संधी मिळाली तर ती कधी सोडू नका, आणि मिळत नसेल तर ती निर्माण करा आणि स्वतःला सिद्ध करा. शेवटी जीवन तुमचं तुम्हीच विचार करा.. 

                                         

Friday, 27 September 2019

स्वप्न जीवनाचे..

जीवनात सर्वांचे च काही न काही स्वप्न असतात. आणि एक दिवस ते नक्की पूर्ण होतील अशी सर्वाना आशा असते. पण वेळेच्या प्रवाहामध्ये ते बहुतांश वेळेस मागे पडून जाता. आणि खुप सारा वेळ निघून गेल्यावर आपल्याला याची जाणीव होती की आपण आपल्या स्वप्नांपासून खूप दूर भरकटलो गेलो आहोत. आणि त्या वेळेस मात्र आपल्याला खूप दुःख होते, पश्चाताप होतो.  राग येतो. की का मी माझे जीवनाचे ध्येय प्राप्त करू शकलो नाही. का माझे स्वप्न हे स्वप्न च बनून राहिलेत. आणि या सर्व गोष्टी मुळे च आपण जीवन जगणे सोडून ते कटवायला लागतो या निराशे नि की मी जीवनात काहीच करू शकलो नाही. माणसाला वेगवेगळे व्यसन लागण्याचं हेच सर्वात मोठं करण आहे की जीवनात त्याला जे आवडतं ते त्याला करता येत नाहीये. आरे पण या गोष्टीचा विचार कधी केला आहेस का की या स्थितीत तू जे काही आज आहे या साठी कुठे ना कुठे तूच करणीभूत आहे. तू तुझ्या जीवनात तुझ्या स्वप्नासाठी किती वेळ देत होता.  भले तुझ्या वर किती ही  इतर जबाबदाऱ्या असतील. पण तरी तू तुझ्या स्वप्नासाठी किती समर्पित होता. नसेल जमत तुला पूर्ण वेळ देता पण जितका देता येऊ शकत होता तितका तू दिलास का ? 100 अडचणी असतील तुझ्या वाटेत पण त्यांना सामोरे जाण्यासाठी खरंच तू किती  चिकाटीने धडपडलास? 1000 वेळेस तू हरला असशील पण 1001 व्या वेळेस लढण्यासाठी उठलास का? आणि स्वप्नांना  स्वप्न  म्हणून च  बघण्यासाठी तू मृत्यूची निद्रा जोपलायस का?
अजून ही वेळ गेलेली नाहीये, हे जीवन आपलय , हा मानवी जन्म अमूल्य आहे. पुन्हा मिळेल की नाही माहिती नाही. त्या मुळे आता पासूनच आपल्या जीवण्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जगा. दिवसातील नसेल पूर्ण वेळ देता येत तर जितका जमेल तितका वेळ द्या. पण नक्की द्या. कारण हीच गोष्ट तुम्हाला तुमचा दिवस सार्थकी लागल्याचं समाधान देईल. भले ही तुमचे स्वप्न इतरांसाठी ते मूर्खपणा वाटत असो. पण ते तुमचे स्वप्न आहे तर ते तुम्ही जगा. स्वप्न कितीही मोठे असो ते पूर्ण होतात. फक्त तुमची जिद्द आणि तुमचं समर्पण तेवढ असायला हवाय.
शेवटी एवढंच की उठा, आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करा, अजून ही वेळ गेलेली नाहीये...

बलात्कार

  तुम्ही जीवनात कधी बलात्कर केलाय का हो ? आहो, तुमच्या जिभेला काही हाड! हा काय प्रश्न आहे! बला त्कर नि आम्ही. कधी च नाही. आणि असा विचित्र...