Saturday, 28 September 2019

संधी च सोन / Golden Opportunity

 

जीवनात एक गोष्ट आपण सर्वांनी नेहमी ऐकली असेल ती म्हणजे की  "मिळालेल्या संधी च सोन करायला हवंय." पण आजच्या जगामध्ये ही बाब कितपत खरी ठरते, हे मोठ प्रश्न चिन्ह च आहे.  कारण आज च जग हे स्पर्धेच जग आहे.  आज संधी ही तुमच्याकडे चालून येत नाही तर  तुम्हालाच ती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल .  संधी येऊन तुमचं दारं ठोठावेल , असा जो पर्यंत तुम्ही विचारच करत असाल, तो पर्यंत दुसरा येऊन ती तुमच्या हातून ती हिसकावून घेऊन गेलेला असेल.  त्यामुळे स्वतः मधील आत्मविश्वास वाढवून धीट व्हायला हवाय. परिणामाचा खूप विचार न करता लगेचच संधी ला स्वतःकडे ओढून घ्या. कदाचित पहिल्या डावात तुम्ही विशेष करू नाही शकणार पण ती गोष्ट तुम्हाला एक अनुभव देऊन जाईल. पुन्हा त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी एक आत्मविश्वास देऊन जाईल. स्वतःला जितकी कठोर आव्हानं  तुम्ही  द्याल. तितकेच अधिक तुम्ही विकसित मौल्यवान होत जाल. ज्या प्रमाणे एक हिरा 1000 टाचाचे घाव सहन करून मौल्यवान होतो  अगदी त्याच प्रमाणे.  त्यामूळे स्वतःला विकसित करण्याचा संधी मिळाली तर ती कधी सोडू नका, आणि मिळत नसेल तर ती निर्माण करा आणि स्वतःला सिद्ध करा. शेवटी जीवन तुमचं तुम्हीच विचार करा.. 

                                         

6 comments:

सिद्धी आणि साधना

  लहानपणी रामायण महाभारत किंवा इतर कुठल्याही देवाच्या मालिका जेव्हा बघायचो तेव्हा मला एका गोष्टी च खुप कुतूहल वाटायचं. त्यात दाखवायचे. एखादा...