Monday, 12 February 2024

सिद्धी आणि साधना

 लहानपणी रामायण महाभारत किंवा इतर कुठल्याही देवाच्या मालिका जेव्हा बघायचो तेव्हा मला एका गोष्टी च खुप कुतूहल वाटायचं. त्यात दाखवायचे. एखादा ऋषि मुनी किंवा एखादा राक्षस हे वर्षोनुवर्षे तपसर्या / साधना करायचे मग एक दिवस ब्रम्ह देव किंवा भगवान शंकर येऊन त्यांना त्यांचा इच्छेप्रमाणे वरदान द्यायचे. मग ते म्हणायचे की आम्हाला आता वैशिष्ट् सिद्धी प्राप्त आहे. त्याच्या जोरावर ते काहीही करू शकायचे. तेव्हा कधी कधी त्या बाल मनात प्रश्न यायचा की किती भारी ना आपण जर समजा अशी तपसर्या केली तर खरचं आपल्याला पण देव येऊन आपल्याला जो हवा तो वरदान देतील का, आपल्याला पण त्यांच्यासारखी सिद्धी प्राप्त होईल का , आपण पण आपल्याला हवं ते करु शकू का...??

    पण नंतर वाटायचं की छे आज च्या जमान्यात कुठे ते शक्य आहे का. आजकाल कुठे देव कसली साधना नि कसली सिद्धी. आणि कोण एवढे वर्ष ते तपसर्या वगरे करत बसलं. 

   पण नाही, आपण जर नीट विचार केला तर आपल्याला जाणवेल. तेव्हा जे दाखवलं जायचं ते काही खोट नव्हतं. नि तेव्हा जे व्हायचं, ते आज सुद्धा होत. आज सुद्धा माणसाने साधना केली तर त्याला सिद्धी प्राप्त होतेच..!! आहो साधना म्हणजे काय एखादी गोष्ट आत्मसात करायची असेल किवां मिळवायची असेल तर ती गोष्ट साध्य होण्यापर्यंत सातत्याने घेतलेले कष्ट म्हणजे चे केलेली एक प्रकारची तपसर्या. जस त्या काळी तपस्वी ला साधना करताना, कडाक्याची थंडी, तप्त ऊन, वादळ वारा या सर्वांला सहन करत न डगमगता निरंतर एकचित्त होऊन फक्त आपल्या साधने वर जेव्हा लक्ष केंद्रित करायचा तेव्हा च त्याला ती सिद्धी प्राप्त होयची. आजच्या काळात पण तसाच आहे ना हो.. जेव्हा आपण एखाद ध्येय डोळ्यापुढे ठेवतो आणि ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू करतो. तेव्हा एक प्रकारची आपण साधना करत असतो. हे सर्व करत असताना आपल्याला अडचणी, अडथळे हे येणारच. पण या सर्वाला सहन करून जेव्हा आपण न डगमगता आपल्या साधने वर लक्ष केंद्रित करतो. तेव्हा एक दिवस नक्की आपल्याला ते साध्य होते जे आपल्याला हवे होते, म्हणजे च आपण त्या गोष्टी मध्ये सिद्धी च प्राप्त करतो. 

   दुसरी एक गोष्ट जी मला जाणवली, तपसर्या ही ऋषीमुनींनी केली तरी त्यांना सिद्धी प्राप्त होत होती नि राक्षस/ दानवानी केली तरी त्यांना सुद्धा सिद्धी प्राप्त होत होती. आज च्या जगात सुद्धा तुम्ही कोण आहेत, काय आहात, ही गोष्ट महत्वाची नाही. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवाची आहे तर तुम्ही ती मिळवू शकता. त्या मुळे च स्वामी विवेकानंद यांनी ही सांगितलंय की "All Power Within You, You Can Do Anything & Everything. Believe On That..!!"

सिद्धी आणि साधना

  लहानपणी रामायण महाभारत किंवा इतर कुठल्याही देवाच्या मालिका जेव्हा बघायचो तेव्हा मला एका गोष्टी च खुप कुतूहल वाटायचं. त्यात दाखवायचे. एखादा...