Saturday, 28 September 2019
Friday, 27 September 2019
स्वप्न जीवनाचे..
जीवनात सर्वांचे च काही न काही स्वप्न असतात. आणि एक दिवस ते नक्की पूर्ण होतील अशी सर्वाना आशा असते. पण वेळेच्या प्रवाहामध्ये ते बहुतांश वेळेस मागे पडून जाता. आणि खुप सारा वेळ निघून गेल्यावर आपल्याला याची जाणीव होती की आपण आपल्या स्वप्नांपासून खूप दूर भरकटलो गेलो आहोत. आणि त्या वेळेस मात्र आपल्याला खूप दुःख होते, पश्चाताप होतो. राग येतो. की का मी माझे जीवनाचे ध्येय प्राप्त करू शकलो नाही. का माझे स्वप्न हे स्वप्न च बनून राहिलेत. आणि या सर्व गोष्टी मुळे च आपण जीवन जगणे सोडून ते कटवायला लागतो या निराशे नि की मी जीवनात काहीच करू शकलो नाही. माणसाला वेगवेगळे व्यसन लागण्याचं हेच सर्वात मोठं करण आहे की जीवनात त्याला जे आवडतं ते त्याला करता येत नाहीये. आरे पण या गोष्टीचा विचार कधी केला आहेस का की या स्थितीत तू जे काही आज आहे या साठी कुठे ना कुठे तूच करणीभूत आहे. तू तुझ्या जीवनात तुझ्या स्वप्नासाठी किती वेळ देत होता. भले तुझ्या वर किती ही इतर जबाबदाऱ्या असतील. पण तरी तू तुझ्या स्वप्नासाठी किती समर्पित होता. नसेल जमत तुला पूर्ण वेळ देता पण जितका देता येऊ शकत होता तितका तू दिलास का ? 100 अडचणी असतील तुझ्या वाटेत पण त्यांना सामोरे जाण्यासाठी खरंच तू किती चिकाटीने धडपडलास? 1000 वेळेस तू हरला असशील पण 1001 व्या वेळेस लढण्यासाठी उठलास का? आणि स्वप्नांना स्वप्न म्हणून च बघण्यासाठी तू मृत्यूची निद्रा जोपलायस का?
अजून ही वेळ गेलेली नाहीये, हे जीवन आपलय , हा मानवी जन्म अमूल्य आहे. पुन्हा मिळेल की नाही माहिती नाही. त्या मुळे आता पासूनच आपल्या जीवण्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जगा. दिवसातील नसेल पूर्ण वेळ देता येत तर जितका जमेल तितका वेळ द्या. पण नक्की द्या. कारण हीच गोष्ट तुम्हाला तुमचा दिवस सार्थकी लागल्याचं समाधान देईल. भले ही तुमचे स्वप्न इतरांसाठी ते मूर्खपणा वाटत असो. पण ते तुमचे स्वप्न आहे तर ते तुम्ही जगा. स्वप्न कितीही मोठे असो ते पूर्ण होतात. फक्त तुमची जिद्द आणि तुमचं समर्पण तेवढ असायला हवाय.
शेवटी एवढंच की उठा, आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करा, अजून ही वेळ गेलेली नाहीये...
Subscribe to:
Posts (Atom)
सिद्धी आणि साधना
लहानपणी रामायण महाभारत किंवा इतर कुठल्याही देवाच्या मालिका जेव्हा बघायचो तेव्हा मला एका गोष्टी च खुप कुतूहल वाटायचं. त्यात दाखवायचे. एखादा...
-
लहानपणी रामायण महाभारत किंवा इतर कुठल्याही देवाच्या मालिका जेव्हा बघायचो तेव्हा मला एका गोष्टी च खुप कुतूहल वाटायचं. त्यात दाखवायचे. एखादा...
-
जीवनात एक गोष्ट आपण सर्वांनी नेहमी ऐकली असेल ती म्हणजे की "मिळालेल्या संधी च सोन करायला हवंय." पण आजच्या जगामध्ये ही बाब कि...
-
जीवनात सर्वांचे च काही न काही स्वप्न असतात. आणि एक दिवस ते नक्की पूर्ण होतील अशी सर्वाना आशा असते. पण वेळेच्या प्रवाहामध्ये ते बहुतांश वे...